'मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे' छगन भुजबळांनी केली मोठी मागणी

'मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे' छगन भुजबळांनी केली मोठी मागणी

'मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी', आम्ही एका जातीसाठी लढत नाही असेही भुजबळ म्हणाले.
Published by :
Team Lokshahi
Published on

आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप मराठा आरक्षणावर आरोप केला आहे. 'मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी', आम्ही एका जातीसाठी लढत नाही असेही भुजबळ म्हणाले. कुणी मला स्वातंत्र्य दिलं, कुणी मला आरक्षण दिलं. आता अलीकडे फार अडचणीचा काळ आहे, ओबीसींच्या दृष्टीने फार अडचणीचं आहे. आमचं म्हणणं आहे, की ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधून केले आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अनेक वर्षांचा हा लढा होता. त्या लढ्यात अनेक लोकांचे बलिदान गेले. देशभर याचा उत्साह, प्रेम आहे. काही लोकं टीका करतात. पण प्रत्येकाचं मत आहे. पण श्रेय घेण्याचे प्रयत्न होत असतात. भाजपा, विश्व हिंदू परिषद याचे श्रेय घेईल. गर्दी कमी झाल्यावर सर्व मंत्रीमंडळ तिथे जाईल. सगळीकडे मंदिराची सफाई हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळे अनेक मंदिरे साफ झाली. इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे साफ असतात. पहिल्यापासून भाविक नाशिकमध्ये येतात असे भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठी समाजाच्या मोर्च्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, लोकशाहीत मोर्चा हा अधिकार आहे. आम्ही एका जातीसाठी लढत नाही. आरक्षण संपवण्याचा घाट कुणी घालत असेल, तर ते वाचवण्याचा प्रयत्न सरकार आणि बाहेरच्या लोकांनी देखील केला पाहिजे. वेगळं आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण काही लोकं अडचण निर्माण करत आहे. बीडमधील प्रकार हा झुंडशाही आहे. या झुंडशाही पुढे सरकार, न्यायालय यांनी वाकू नये. धमकी देणे हे लोकशाहीत अभिप्रेत नाही असे ते म्हणाले.

अतिशय चांगलं हे आवाहन आहे. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर दंगल झाली. आता जे झालं, ते झालं. मंदिर होत आहे, मस्जिदसाठी देखील जागा दिली आहे, त्यांचं काम ते करतील असे मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहे.

तुम्ही उद्या मंदिरात जाणार का ? असे भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, मी काही नास्तिक नाही. मी पंढरपूरला जाऊन आलो. मी शिवसेनेत असताना, रथाला परवानगी नसताना मी रथ काढला होता असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com