मला गोळ्या घातल्या तरी...; जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल, समाजात गैरसमज पसरवू नका
जालना : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने मराठ्यांविरोधात ट्रॅप रचला आहे. सरकार आमच्याविरोधात खोटा बातम्या पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ते जालन्यात बोलत होते. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने इकडून निर्णय आल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्या. तुम्हाला पाहिले 54 लाख नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्यावे लागतील, नंतर त्यांच्या नातेवाईकांना आणि नंतर सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचे आहे. व्याख्येसह म्हणजे अधिकारी त्रास देणार नाहीत.
मला माहिती आहे, तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली. 70 वर्ष मराठ्यांनी झुंज दिली, सरकारने भानावर यावे. तुम्हाला गोडगोडीने वेळेत तोडगा काढावा लागेल. तुम्ही विनाकारण लांबवू नका. समाजात तुम्ही गैरसमज पसरवू नका, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मराठ्यांच्या पुढे आता कोणी नाही, हे आंदोलन आता आम्ही राज्यव्यापी, देशव्यापी करणार आहोत. तुम्ही आता गाफील राहू नका. तुम्हाला 7 महिने वेळ दिला, थोडा थोडका वेळ दिला नाही. तुमचे अधिकारी जाणून-बूजून प्रमाणपत्र देत नाही, असे म्हणत जरांगे पाटील संतापले आहेत. तुमचा कायमचा सुपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मला जरी गोळ्या घातल्या तरी तुम्ही माझा विचार मागे जाऊ देऊ नका. 20 तारखेला आंतरवली सराटीत जमा व्हा, एकही मराठा घरात राहू नका, असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे