Maratha Reservation : अखेर Manoj Jarange Patil यांचे उपोषण मागे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली होती. उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबरोबर यावे. अशी त्यांनी अट घातली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर आता 17व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडले. अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेणं या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर उपस्थित आहेत.