गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान हा गैरसमज दूर झाला; जरांगे पाटलांचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, या कार्यक्रमादरम्यान मोदी मराठा आरक्षणावर काहीच न बोलल्याने जरांगे पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे.

जालना : आधी नरेंद्र मोदी हे गरीबांचे प्रश्न सोडवतील असा गैरसमज होता. पण, मोदी बोलले नाही. यामुळे गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान हा गैरसमज दूर झाला, अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, या कार्यक्रमादरम्यान मोदी मराठा आरक्षणावर काहीच न बोलल्याने जरांगे पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरिबांच्या मुलांसाठी विनंती केली होती. मात्र, याविषयी नरेंद्र मोदी बोलले नाही. मराठा समाजाने नरेंद्र मोदी यांना येऊ दिले नसते. मोदी बोलले नाही हे बरे झाले कारण यावरून समजते की यांना गोरगरीब यांची गरज नसून आता ही लढाई आम्ही आमची लढणार. येथं येऊन नरेंद्र मोदी हे आरक्षण देऊ शकत नाही तर तेथून कुठं आरक्षण देणारं आहेत, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com