इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ममता बॅनर्जींनी सांगितले...
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी बैठक पार पडणार आहे. यासाठी त देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत.इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.
विरोधकांच्या इंडियाचं नेतृत्व कोण करणार? त्यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? यावर चर्चा सुरु झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुंबईमध्ये दाखल झाल्या. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले की, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?यावर त्या म्हणाल्या की, इंडिया आघाडी हीच पतप्रधानपदाचा चेहरा असेल. आम्ही यासाठी केवळ इंडियाकडे पाहतोय. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या देशात गरीब कुटुंबं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना ८०० रुपये किंवा ९०० रुपयांचा गॅस परवडत नाही.किंमत कमी केली परंतु किती वाढवलेली ते माहिती आहे ना? त्यांनी आधी भरमसाठ किंमत वाढवली आणि आत्ता निवडणूक आल्यावर किंमत कमी केली आहे. असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.