मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), बंडखोर आमदार (Shinde Group) यांच्या आज बैठकांचे सत्र होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.
एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ ठाण्यात घोषणाबाजी,आमच्या नादी लागाल तर भारी पडेल,आपण कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी देऊ नका
महाराष्ट्रात येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत बोललो,सध्या आम्ही कोणाच्याच नावाने मत मागितली नाही,शिवसेनेला आम्ही हायजॅक केलेलं नाही,आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही,
शिवसेनेचे बंडखोर आमदार यांच्याविरोधात पालघर मधील शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते. जिल्ह्यात काही ठिकाणी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली होती. याच बॅनरला काल फासत या बॅनरवर गद्दार असं लिहून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी बंडखोरांच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या सर्व बॅनर वर काळे फासण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. पालघर विधानसभेचे आमदार हे बंडखोर आमदारांमध्ये सामील झाले आहेत त्यांनी पालघर मध्ये यावं त्यांना मातोश्रीचा प्रसाद शिवसैनिकांकडून देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी सांगितले आहे..
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील घरासमोर साताऱ्यातील शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसानी संतप्त शिवसैनिकांना पोवई नाक्यावर अडवून देसाई यांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखलं. त्यामुळे शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.. शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असल्याचा आरोप करत गद्दारांना माफी नाही म्हणत शिवसैनिकांनी निषेध केलाय.
एकीकडे बंडखोर आमदारांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात शिवसैनिक आक्रमक झाले असताना बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनमध्ये बुलढाणा येथे शिवसैनिकांच्या घोषणा धर्मवीर संजय गायकवाड जिंदाबाद, आघाडी सोडा आघाडी सोडा उद्धव ठाकरे, आघाडी सोडा अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
एकनाथ शिंदे गटाचे परंडा विधानसभा मतदार संघाचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद शहरातील पोलीस मुख्यालयासमोरील संपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल करत तोडफोड केलीय. सावंतांचा फोटो असलेला फलक तोडून संतप्त शिवसैनिकांनी त्यावर काळे फासले. गद्दार तानाजी सावंताचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा देत कार्यालयाच्या शर्टरवर गद्दार खेकडा असे लिहून तीव्र रोष व्यक्त केला. उस्मानाबाद जिल्हा हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे गतवेळच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना संधी मिळाली होती. तरीसुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी करुन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या सावंतांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिलाय.
यवतमाळ : शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. आमदार शिंदे गटात सामील झाले. मात्र, शिवसैनिक अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यातूनच बंडखोर आमदार, मंत्री यांच्या कार्यालयाला टार्गेट करून तोडफोड करण्यात येत आहे. यापाश्वभूमीवर यवतमाळ येथील आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयासह घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वरीष्ठ पोलिस अधिकारी सर्व घडामोडीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. आईचे दूध विकणाऱ्या गद्दारराना माफ करणार नाही, त्यांना धडा शिकवला जाईल,असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर साताऱ्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर देसाई यांच्या घरासमोर पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सातारा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोवई नाका परिसरात पोलीस गस्त घालत आहेत. तसेच देसाई यांच्या घरासमोर वाहने लावण्यास वाहतूक शाखेच्या वतीने मनाई करण्यात आली आहे.
शिवसेना भवनात शिवसेना कार्यकारणीची बैठक सुरु होत आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन शिवसेना भवनात दाखल होत आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राजारामपुरी कार्यालयावरील पोस्टर शिवसैनिकांनी फाडले. एकनाथ शिंदे यांच्या गटात राजेश क्षीरसागर सामील झाल्याने तीव्र संताप शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला. माजी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पोस्टर फाढले.
बंडखोर शिवसेना आमदारांच्या विरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार राडा केलाय...आमदार तानाजी सावंत यांच बालाजी नगरचा कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं आहे... सकाळी दहा ते बारा शिवसैनिकांनी मिळून तानाजी सावंत यांच्या साखर कारखान्याचे कार्यालय मोठ्या प्रमाणात फोडून गद्दार असा लिहीत तानाजी सावंत यांचा निषेध केला आहे. पोलिसांनी या शिवसैनिकांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सध्या या परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,
मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे आणि सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. प्रत्येक राजकीय कार्यालयात अधिकारी-स्तरीय पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत तर जळगावात मात्र एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना ही बाळासाहेबांचीच डुपलीकेटांची नाही अशा आशयाचे बॅनर जळगाव शहरात ठिकठिकाणी नाही. एकनाथ शिंदे यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या बॅनरवर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह स्व.आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याने आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर इथल्या निवासस्थानी राजकीय घडामोडी वाढलेल्या पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने आज रामदास आठवले सागर बंगला इथे दाखल झाले आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचं बालाजीनगर येथील कार्यालय पुण्यातील शिवसैनिकांनी फोडल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतलेली आहे. यानंतर ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली अशा शिवसैनिकांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई केली जाणार आहे.
एकनाथ शिंदे आमदारांच्या गटातील संरक्षण काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक टि्वट करुन सरकारला ईशारा देण्यात आला आहे.
आज बैठकांचे सत्र, रणनीती ठरणार
गुवाहाटीतील बंडखोर आमदारांची आज बैठक होणार असून पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी शिंदे गट चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. या बैठकीत माध्यमांसमोर आपली अधिकृत भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमधून गट प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. लवकरच या प्रवक्त्यांची नावं जाहीर करण्यात येतील. शिवसेनेचीही आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.