शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच

शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची माहिती
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, सत्तासंघर्षावर उद्याच गुरुवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. यावरुन सत्ताधारी-विरोधकांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी नोंदवल्या होत्या. तर, राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाची उद्या घोषणा करणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी अंती निकाल राखून ठेवला होता. या निकालावर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निकाल लागल्यास ठाकरे गटाचे १४ आमदारांची कारकीर्द धोक्यात येणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com