Abdul Sattar
Abdul Sattar Team Lokshahi

मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर बुधवारी तुमच्याकडे राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते - मंत्री सत्तार

आमचे हनुमान महाराज देशाचे दैवत आहेत. ज्या प्रमाणे हनुमान हे प्रभू रामाचे भक्त आहेत. तसाच मी एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्याचे मंत्री रोज कुठल्या ना कुठल्या विधानाने वक्तव्याने चर्चेत येत आहेत. नुकताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला वादग्रस्त प्रश्न विचारला होता. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका करत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याच विषयावर आज माध्यमांशी बोलत असताना मंत्री सत्तार यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी तुमच्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते. असे खळबळजनक विधान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

Abdul Sattar
आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 25 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केले - देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले मंत्री सत्तार?

माध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी तुमच्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते. सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण गदा घेऊन येतं आणि त्याचा मुकाबला आमची ढाल तलवार कशी करते हे तुम्हाला दिसेल. चंद्रकांत खैरे यांनी माझ्या विरोधात येऊन लढावं. त्यांच्यासाठी सिल्लोडमधील मैदान खाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी हातात घेतलेल्या गदेसाठी हनुमानाची ताकद लागते. ती ताकद खैरे यांच्याकडे नाहीय ते माझ्याशी काय लढणार? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.

यापूर्वीच एक विकेट मी इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून घेतली आहे. माझ्याकडे अचूक बॉलिंग आहे. कुणाची कशी विकेट घ्यायची, कशा परिस्थितीत घ्यायची हे मला माहीत आहे. बॅटिंगला येणाऱ्या प्रत्येकाला माझा हा इशारा आहे, मुख्यमंत्री ज्याची विकेट घ्यायला सांगतील त्याची विकेट घेणार, असा इशाराही त्यांनी दिला.

Abdul Sattar
जो प्रकल्प येतो तो गुजरातलाच कसा जातो? राज ठाकरेंचा सवाल

आमचे हनुमान महाराज देशाचे दैवत आहेत. ज्या प्रमाणे हनुमान हे प्रभू रामाचे भक्त आहेत. तसाच मी एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे. दोघांचीही मॅच होऊनच जाऊ द्या. मी कृषीमंत्री आहे. आमदार आहे. पण खैरेंकडे कोणतंच पद नाही. राजीनामा दिल्यावर त्यांच्या नेत्यांनी येऊन लढावे. आता काय ते उद्याच होऊ द्या, असे आव्हान यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत खैरे यांना दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com