Vinayak Mete | Devendra Fadnavis
Vinayak Mete | Devendra Fadnavisteam lokshahi

विनायक मेटेंच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, 24 ऑगस्टपासून निर्णय येणार अंमलात

24 ऑगस्टपासून निर्णय येणार अंमलात
Published by :
Shubham Tate
Published on

Vinayak Mete : माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, हा अपघात ड्रायव्हरचा चुकीने घडला होता. मेटे, 52 वर्षीय शिवसंग्राम पक्षाचे नेते, 14 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील माडप बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर त्यांची कार मुंबईकडे जात असलेल्या ट्रकला धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Maharashtra government's big decision after Vinayak Mete's accident, information from Devendra Fadnavis)

दरम्यान, मेटे यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी वाहन चालकांना मुंबई येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा अपघात घडण्याची शक्यता कमी होईल.

Vinayak Mete | Devendra Fadnavis
Girls Health : मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींची वाढ थांबते; या गोष्टींची काळजी घ्या

14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर विनायक मेटे यांचा अपघात झाला. मात्र हा अपघात होता की घातपास, असा संशय व्यक्त केला जातोय. मेटे यांच्या ड्रायव्हरकडून लोकेशन सांगण्यात गोंधळ झाल्यामुळे अपघात स्थळी पोलीस लवकर पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात दिली. दरम्यान, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

Vinayak Mete | Devendra Fadnavis
इसिसच्या निशाण्यावर भारत; देशातील बड्या नेत्यांवर हल्ल्याचा होता प्लॅन

दरम्यान, मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते बीड येथून त्यांच्या गृहजिल्ह्यातून जात होते. मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रस्तावाला फडणवीस यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली. ड्रायव्हरने लेन बदलून डावीकडून लेनच्या मध्यभागी असलेल्या दुसऱ्या अवजड वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अजून एक जड वाहन आधीच डाव्या लेनमध्ये जात होते आणि त्याला ओव्हरटेक करायला जागा नव्हती. ड्रायव्हरचा हा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता. अस त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com