Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

मुख्यमंत्री पदाची शपथ घेताचं एकनाथ शिंदेंची जोरदार बॅटिंग

प्रलंबित प्रश्न, योजनांना पुढे घेऊन जाऊ; एकनाथ शिंदेंचं आश्वासन
Published by :
Shubham Tate
Published on

Eknath Shind : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदेंचा शपथविधीही आजच पार पडला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री असणार आहेत. (Eknath Shinde's swearing in as Chief Minister)

Eknath Shinde
...म्हणून फडणवीसांनी दिली एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि परिस्थितीची माहिती घेतली. प्रलंबित प्रश्न, योजनांना पुढे घेऊन जाऊ असे शिंदे यांनी सांगितले आहेत. माजी मुख्यमंत्रीही सोबत आहेत, त्यामुळे जोरदार बॅटिंग करु असेही शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
एकनाथ खडसेंनी दिली शपथविधीवर खोचक प्रतिक्रिया; शपथ घेताच फडणवीसांचं ट्वीट

कोण आहेत एकनाथ शिंदे

1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार.

2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.

12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता.

5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री. तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री.

ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.

नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री.

आणि आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com