Devendra Fadnavis | Bhagatsingh Koshyari
Devendra Fadnavis | Bhagatsingh Koshyari Team Lokshahi

फडणवीसांचा राज्यपालांना घरचा आहेर, आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज

आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच काल औरंगाबादेत बोलत असताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यावर एकच राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीका होत होती. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 24 तासांनंतर आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांना घरचा आहेर दिला आहे.

Devendra Fadnavis | Bhagatsingh Koshyari
पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावं? संभाजी छत्रपतींची वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया

काय म्हणाले फडणवीस?

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर भूमिका मांडताना फडणवीस म्हणाले की, “जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आणि आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही” असे म्हणत त्यांनी राज्यपालांना उत्तर दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला वाटत नाही की, राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढण्यात आले आहेत. पण राज्यपालांच्यादेखील मनात असे कुठलेही भाव नाहीयत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही”, अशी भावना सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी आपण त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकलेले आहे. यामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने महाराजांनी माफी मागितलीय, असे म्हटलेले नाही, अशी भूमिका मांडली.

Devendra Fadnavis | Bhagatsingh Koshyari
सुधांशु त्रिवेदीवर जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, ह्याच्या बापाने शिकवलेला का याला इतिहास

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com