Maha Vikas Aghadi Nashik Graduate election
Maha Vikas Aghadi Nashik Graduate electionTeam Lokshahi

नाशिक पदवीधर निवडणुकीचा पेच वाढला, ठाकरे गटाचा या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

शुभांगी पाटील या नाशिक पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे नाशिक पदवीधर निवडणुकीत चांगलाच पेच निर्माण झाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. यावरूनच काल राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यातच महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यातच आज या निवडणुकीवरून मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत शुभांगी पाटील या नाशिक पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी दिले होते संकेत?

सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही. पण नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही. आम्ही मातोश्रीवर भेटणार आहोत. त्यात निर्णय घेऊ.महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते निर्णय घेणार आहोत. महाविकास आघाडीचं राज्यात सरकार होतं. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हे सरकार आम्ही चालवलं. त्यात उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीने सरकार चालवलं तोच समन्वय तोच एकोपा हा विरोधी पक्षात असतानाही असायला हवा. तरच आपण पुढील लढाया जिंकू शकतो. ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झालाय तो झालाच आहे. तो नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत ती घटना घडली असली तरी त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहिलं पाहिजे. असे संजय राऊत यांनी संकेत दिले होते.

कोण आहेत शुभांगी पाटील?

शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आणि राज्याच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापकदेखील आहेत. जळगावमधील गोपाळ बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com