महापालिका आयुक्त ट्रीगर पॉईंटवर काम करताहेत; किशोरी पेडणेकरांची टीकास्त्र
मुंबई : अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या उमेदवारीवरुन राज्यात मोठा राजकीय गोंधळ सुरु झालेला पाहायला मिळत आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महानगरपालिका आयुक्त सनदी इकबाल चहल अधिकारी आहेत. हे अधिकारी कायदा कानून मानून चालतात असं वाटतं होते. इकबाल चहल यांनी कोविड काळात यांच्या बरोबर काम केलं आणि त्यांना नाव मिळालं, इतकं होऊन ते आज ट्रीगर पॉईंटवर काम करत आहेत, असा घणाघात त्यांनी आयुक्तांवर केला आहे. एका विधवा बाईने ठरवलं की आपल्या पतीच काम पुढे नेलं पाहिजे. बाळासाहेब यांच्या विचारांचा शिंदेसाहेब उल्लेख करत आहेत मग का तिची मुस्कटदाबी करत आहेत. तिची बांधिलकी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे. त्यांनी पगारही भरला आहे. तिथे असेलेले अधिकारी यांना नियमाने काम करत नाही आहेत. त्यांचा राजीनामा दाबून ठेवत आहेत का?
शिंदे फडणवीस सरकार दबाव आणत आहेत. इकबाल चहल हे घाबरत आहेत, नियमांची पायमल्ली करत आहेत. जे जे आमदार विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे त्यांच्यावर केसेस नाही. ज्या अर्थी आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे. तसाच त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे का? बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. कोर्टाने तोंड फोडलं की महापालिका जागी होते. शिंदे फडणवीस सरकारला महापालिका घाबरत आहे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, आम्ही संयमाने जाणार आहे. आमच्या कृतीमुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याच कारण आम्हाला बनायचं नाही. वेळ आली तर कोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, शिंदे गटाने शिवसेनाच्या चिन्हावर दावा ठोकल्याने निवडणूक आयोगाने धनुष्यबाण तात्पुरते गोठविले. यानंतर निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिले आहे. परंतु, मशाल चिन्हावरुनही आता नवा वाद उभा राहीला आहे. मशाल चिन्हावर आता समता पार्टीने दावा केला आहे. यावर बोलताना किशारी पेडणेकर म्हणाल्या, हे आयोग बघून घेईलय दिलेला निर्णय ते मागे घेऊ शकत नाही. आम्हाला काहीच शंका नाही, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.