राजकारण
लोकशाहीच्या बातमीवर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया; सोमय्यांचे फडणवीसांना पत्र
किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे.
किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, माझ्याकडून कोणत्याही महिलांवर अत्याचार झालेला नाही. याची चौकशी करावी. असे किरीट सोमय्या यांनी फडणवीसांना पत्र लिहिले आहे.