ठाकरे व हिरवं सरकार असताना लव्ह जिहाद प्रकरण वाढलं; सोमय्यांचा घणाघात

ठाकरे व हिरवं सरकार असताना लव्ह जिहाद प्रकरण वाढलं; सोमय्यांचा घणाघात

किरीट सोमय्या यांचा पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Published on

मुंबई : 'द केरळ स्टोरी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला जमविला असून घोडदौड अद्याप सुरुच आहे. अशातच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकार व हिरवं सरकार असताना लव्ह जिहाद प्रकरण वाढलं, असा निशाणा त्यांनी महाविकास आघाडीवर साधला आहे.

ठाकरे व हिरवं सरकार असताना लव्ह जिहाद प्रकरण वाढलं; सोमय्यांचा घणाघात
संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणीचे नार्वेकरांना पत्र; शिरसाटांनी केले गंभीर आरोप

लव्ह जिहादमधील महाराष्ट्रातील गाजलेले प्रकरण म्हणजे श्रद्धा पालकर व आफताब पूनावाला आहे. उद्या श्रद्धाच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होतंय. उद्या श्रद्धा पालकर हत्येच्या वर्षापूर्तावर एक मूक मोर्चा काढण्यात येत आहे. वालकर कुटुंबाच्या या मोर्चात मी स्वतः सहभागी होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

ठाकरे सरकार व हिरवं सरकार असताना लव्ह जिहाद प्रकरण वाढलं. अकोलामध्ये केरला स्टोरीवरून वाद सुरु आहे. अशातच, त्र्यंबकेश्वरमध्ये चादर चढवण्याचा प्रकार समोर आला आहे. आम्ही या घटनांचा निषेध करत आहोत.

विकृत विरोधी पक्षाची विकृती आहे. महिला हरवणे किंवा बेपत्ता होणे वेगळा विषय आहे. त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. केरळ स्टोरीमध्ये ३ महिलांना फसवण्यात आलं. केरळा स्टोरी हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. विदेशात धर्म प्रसार व आतंकवाद्यांसाठी केला जात आहे. परंतु, मुस्लिम मतांना एकगठ्ठा ताब्यात घेणे हेच विरोधकांचे टार्गेट आहे. सत्ता स्थापन करणे हेच विरोधकांचे ध्येय आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

तर, समीर वानखेडेने जो गुन्हा केला त्याची चौकशी सीबीआय करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातच ही चौकशी सुरु आहे. नवाब मलिक यांच्या जावईच्या चौकशी वेळी त्यांनी वानखेडेवरून आरोप केले होते. यावेळी दलित विरोध मुस्लिम करून नवाब मलिक राजकारण करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

दरम्यान, श्रध्दा वालकर प्रकरणाने अख्खा देश हादरला होता. तिचा प्रियकर आफताब पुनावालाने श्रद्धाची हत्या करत मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर ते जंगलात फेकून दिले होते. याप्रकरणी आफताबला अटक केली असली तरी अद्यापही याचा तपास सुरु आहे. अशात, उद्या श्रध्दाच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com