"आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा" केतकी चितळे पुन्हा चर्चेत
'हर हर महादेव' हा चित्रपट मागचे काही दिवस राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांनी हा शो पुन्हा सुरू करायला लावला होता. दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचंही वृत्त आहे. मात्र, आता अभिनेत्री केतकी चितळेने वर्तक नगर पोलिसांना पत्र लिहीत एक मागणी केली आहे.
काय म्हटलंय पत्रात?
'सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कलम 120 ब देखील लागू झाला नाही. जेव्हा शेकडो गुंडांनी एका थिएटरवर हल्ला केला ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने मराठी भाषिक मध्यमवर्गीय लोक शांतपणे जमले होते आणि जेव्हा हे गुंड अशा लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी अराजक आणि दंगलीची परिस्थिती निर्माण करतात, तेव्हा हे स्पष्ट होते की ते एक पूर्व-आधी आहे. नियोजित हल्ला. जेव्हा असा क्रूर हल्ला श्री. आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली केला जातो तेव्हा हे सांगण्याशिवाय राहत नाही की ते श्री. आव्हाड हेच थिएटरवर हल्ला करण्याच्या कटाचे सूत्रधार होते.' असं तिने या पत्रात लिहीलं आहे.