राजकारण
Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशच्या मंडी जागेवरुन कंगना रणौत विजयी
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी जागेसाठीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. भाजप उमेदवार कंगना रणौत यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे उमेदवार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी जागेसाठी बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रणौत विजयी झाल्या आहेत.