Kamakhya Temple Eknath Shinde
Kamakhya Temple Eknath Shindeteam lokshahi

Eknath Shinde : बंडखोर आमदार नतमस्तक झाले, 'त्या' कामाख्या मंदिराबद्दलच्या खास गोष्टी

प्रसाद म्हणून लाल कापड
Published by :
Shubham Tate
Published on

Kamakhya Temple Eknath Shinde : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते आसामची राजधानी गुवाहाटीला आमदारांसह गेले. एक एक करत शिवसेनेतील बरेच आमदार एकनाथ शिंदे यांना मिळाले. कामाख्या मंदिराचा इतिहास, जेथे शिवसेनेचे बंडखोर आमदार नतमस्‍तक झाले तेथे (Kamakhya Temple) जावून कामाख्‍या देवीचे दर्शन घेतले. जाणून घेवूया, कामाख्या मंदिरा बद्दलच्या खास गोष्टी … (Kamakhya Temple at Nilacal hills in Guwahati, Assam Eknath Shinde)

कुठे आहे कामाख्या मंदिर?

सध्या चर्चेत असलेले कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीपासून सुमारे सहा कि.मी अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. या मंदिरातील कामाख्या देवी जागृत देवस्‍थान म्हणून ओळखली जाते. ही देवी ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. आठव्या-नवव्या शतकात या मंदिराची रचना झाली असावी, असे मानले जाते. बिहारमधील राजा नर नारायण सिंह यांनी १७ व्या शतकात या मंदिराची पुनरर्चना केली. हे मंदिर एक महत्त्‍वाचे शक्तीपीठ मानले जाते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात मूर्तीच नाही. त्या बाबतीत बऱ्याच अख्यायिका सांगितल्या जातात.

Kamakhya Temple Eknath Shinde
Raees Defamation Case : शाहरुख खानला दिलासा, न्यायालयाची निर्णयाला 20 जुलैपर्यंत स्थगिती

कामाक्षी मंदिर

एका धार्मिक ग्रंथानूसार अशी अख्यायिका आहे की, भगवान महादेव यांचा देवी सतीप्रती असलेला मोहभंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीदेवीच्या मृत तुकड्याचे तब्बल ५१ भाग केले. अवयवाचे तुकडे ज्या ज्या भागात पडले ती ठिकाणे शक्तिपीठ म्हणून प्रसिध्दीस आली.

अंबुवाची पर्वाला अनन्यसाधारण मह्त्त्व

अंबुवाची पर्वाला अनन्यसाधारण मह्त्त्व आहे. तीन दिवस हा सोहळा सुरु असतो. या पर्वात वर्षातून एकदा देवी रजस्वला होते. या दिवसांत देवीची पूजा केली जाते. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात.

Kamakhya Temple Eknath Shinde
Male Infertility : पुरुषांची प्रजनन क्षमता का कमी होत आहे, जाणून घ्या 5 सर्वात मोठी कारणे

प्रसाद म्हणून लाल कापड

या देवीचा इतिहास जसा रंजक आहे तसा या देवीचा प्रसाद ही अनोखा आहे. या प्रसादाचे पावित्र्य खूप असल्याचे भाविक सांगतात. देवीच्या दरबारात अंबुवाची पर्व दिवसात एक पांढरे कापड ठेवले जाते. तीन दिवसांनी जेव्हा देवीचा दरबार खुला केल्यानंतर ते कापड लाल झालेले असते. देवीचे हे कापड प्रसाद म्हणून दिले जाते. या प्रसादाला भाविकांच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कापडाला अंबुवाच कापड असंही म्‍हटलं जाते. हे मंदीर तंत्र-मंत्र साधनेसाठी खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात तुम्ही व्यक्त केलेली कामना पूर्ण होते, भाविकांची अशी श्रद्धा आहे की, म्हणून या मंदिराला कामाख्या मंदिर म्हटलं जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com