मणिपूर मधील हिंसाचार हा सरकार पुरस्कृत? कैलास पाटलांचा आरोप

मणिपूर मधील हिंसाचार हा सरकार पुरस्कृत? कैलास पाटलांचा आरोप

देशातल्या माता बहिणीचे रक्षण होत नसेल तर या सारखी दुर्दैवी गोष्ट नाही; धाराशिवमध्ये मणिपूर महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मौन सत्याग्रह
Published by :
Team Lokshahi
Published on

ओंकार कुलकर्णी|धाराशिव: मणिपूर मधील हिंसाचार हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. जवानाच्या पत्नीवर अत्याचार झाला. पण केंद्र सरकार काही करू शकले नाही, देशातल्या माता बहिणीचे रक्षण होत नसेल तर या सारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असेही यावेळी कैलास पाटील यांनी म्हंटलं आहे.

मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आज धाराशिव शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेध नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये कैलास पाटील हेही सहभागी झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com