50 खोका...तुमने खाया, महाराष्ट्राने क्या पाया; आव्हाडांची रॅप सॉन्गमधून टीकास्त्र
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वज्रमुठ सभेतून रॅप गाण्याद्वारे शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 50 खोका...तुमने खाया, महाराष्ट्राने क्या पाया, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची अंत्यायात्रा काढली, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई खरी वाढवली ती कामगारांनी. घाम गाळून इथल्या कामगारांनी, मराठी माणसांनी मुंबईची शोभा वाढवली. मुंबईत असलेली केंद्र दुसरीकडे हलवली जात आहेत. मुंबईवर राग असलेली मंडळी दिल्लीत बसलेत. ते सांगताहेत दिल्लीच्या तख्ताला आव्हान देऊ शकत नाही. पण, आव्हान जर कोणी सर्वात आधी दिलं असेल तर ते महाराष्ट्रातून देण्यात आलं आहे., असा दावा जितेंद्र आव्हाडांनी म्हंटले आहे.
नवी मुंबईत खारघर घटना घडली. कार्यक्रमाची वेळ काय १२ होती. जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. याचा अर्थ तिथे चेंगराचेंगरी झाली हे स्पष्ट होते. परंतु, एकही मृत्यू पडलेल्या कुटुंबियांच्या घरी नेते गेले नाही. सरकारमध्ये संवेदनाच नाही. तुमच्या महत्वकांक्षेसाठी त्या बिचाऱ्यांचा तुम्ही खून केला. ही राक्षसी वागणे असल्याची टीका त्यांनी केली आहे.
कोकणाचं स्वास्थ बिघडवून कोणताही प्रकल्प असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत असू. मागील अनेक दिवसांपासून आंदोलक सरकारला चर्चेसाठी बोलवतं आहे. परंतु, जिल्हाधिकारी आणि सीपीशिवाय चर्चेसाठी कोणी येत नाही. विरोध होऊनही तुम्ही स्थानिकांचे म्हणणंचं ऐकणार नसाल. तर तुमच्या मनात काळबेरं आहे, असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
रॅपरने रॅप केला तर त्यांना अटक केली. यावरून मी आता रॅप केला आहे. 50 खोका...तुमने खाया, महाराष्ट्राने क्या पाया. लडकेने उसने गले पे लाया, तो पोलिसने उसे जेल दिखाया. अरे 50 खोका बोलतेही तुम क्यू चिडते हो. अपनाही रिश्ता 50 खोकेसे क्यू जोडते हो, असे रॅप जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तुमचं आडनाव आहे का 50 खोके? तुम्ही तुमच्या आडनावाला चिटकून घेतलं आहे. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संस्कृती नव्हती. यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची अंत्यायात्रा काढली, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीसांवर साधला आहे,