जयंत पाटलांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक, दादांचा सांगितला किस्सा
Jayant Patil Eknath Shinde : विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. (Jayant Patil praised Chief Minister Eknath Shinde)
विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चांगल्या कामांना अजित पवार हे नक्कीच समर्थन देतील. अस मत मांडले आहे.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे देखील कौतुक केले आहे. तसेच पुढील कार्याला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून दादांनी केलेले काम नक्कीच महाराष्ट्राच्या हिताची ठरतील. तसेच दादा विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी भूमिका मांडतील. शिंदेंची भाषण शैली देखील आम्हांला भावली, दादा तुमच्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी नक्कीच चांगली काम करतील, महाराष्ट्रात अनेक अडचणी येतील त्यात देखील दादा पुढे येतील.
दादा तुमच्या चुकांवर नाराज होतील पण त्यांचा राग हा जास्त काळ नसतो. त्यामुळे सरकार मधील इतर नेत्यांनी देखील त्यांचा सल्ला घ्यावा अस आवाहन देखील यावेळी जयंत पाटील यांनी केले आहे.