इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत जयंत पाटलांनी सांगितली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले...

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत जयंत पाटलांनी सांगितली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले...

इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, शंभरपेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. पण अजून अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत.
Published on

कल्पना नळसकर | नागपूर : इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, शंभरपेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. पण अजून अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. तर, सरकार कुठेतरी कमी पडत असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीसांवर टीकाही त्यांनी केली आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत जयंत पाटलांनी सांगितली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले...
विदर्भाचं गांभीर्य सरकारला नाही; यशोमती ठाकूर यांचे टीकास्त्र

इर्शाळवाडीची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. तेथील नागरिकांनी आम्हाला इथून हलवा, असं सांगितलं होतं. अशा या पद्धतीनं दगड पडून नुकसान होण्यापूर्वी सरकारने अगोदर उपाययोजना करायला पहिजे होत्या. मात्र, तिथे सरकारी योजना पोहोचत नाही. सरकार कुठेतरी यामध्ये कमी पडत आहे. सरकारने त्वरित मदत करणे आवश्यक आहे. माळीण घटनेनंतर अशा भागात अडचणीच्या ठिकाणांवरील वस्त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करायचं होतं. त्या ठिकाणी नागरिक मागणी करत असताना फॉरेस्ट जमिनी असल्यामुळे त्याला मज्जाव केला. आणि दुर्दैवाने ही घटना घडलीय, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

अमोल मिटकरींनी अजित पवार मुख्यमंत्री बनण्याबाबत सूचक विधान केल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी त्यांचं मत व्यक्त केले, त्यामुळे मी त्यावर काही बोलायचं, मला वाटत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही काम असतील म्हणून ते सगळं कुटुंब घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले असतील. प्रेडिक्शन करणं योग्य नाही. अजित दादांना मुख्यमंत्री या सध्याच्या गणितात कसं होऊ शकतं हे कळल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com