Jayant Patil : १५ दिवस झाले तरी सरकार जागेवर आले नाही

Jayant Patil : १५ दिवस झाले तरी सरकार जागेवर आले नाही

जयंत पाटील यांची शिंदे सरकारवर टीका
Published on

मुंबई : राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अनेक ठिकाणी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला असल्याने महाराष्ट्रावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) टीकास्त्र सोडले आहे.

Jayant Patil : १५ दिवस झाले तरी सरकार जागेवर आले नाही
OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट असून वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावांमध्ये शिरले आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil : १५ दिवस झाले तरी सरकार जागेवर आले नाही
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; जल्लोषात स्वागत

राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी सरकार तयार झाले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, शिंदे गट आणि भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही अद्याप चर्चा सुरु असल्यामुळे अन्य मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी अद्यापही मुहुर्त मिळालेला नाही. त्यातच अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेण्याची ऑफर भाजपानं दिल्याची बातमी समोर आली. मात्र त्यावर आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही बातमी खोटी असून खोडसाळ असल्याचा खुलासा केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com