Indapur: नितेश राणेंच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन; इंदापूरमध्ये नितेश राणेंना येण्यास विरोध
इंदापूरमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. इंदापूरमध्ये नितेश राणेंना येण्यास सकल मराठा समाजाकडून विरोध केला जात आहे. मराठा समाडाकडून राणे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. नितेश राणे इंदापूरमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे. नितेश राणेंच्या समर्थकांनी यासंदर्भात दावा केला आहे.
शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडी संदर्भातील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वतीने इंदापूरमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. या संदर्भात नितेश राणे या मोर्चाचे प्रमुख वक्ते म्हणून इंदापूरमध्ये येणार आहेत. नितेश राणे यांच्याकडून जरांगे पाटलांविरोधात जी भूमिका घेतली जात आहे त्याला विरोध म्हणून नितेश राणे यांनी इंदापूर मध्ये येऊ नये, आम्ही त्यांना इंदापूरमध्ये येऊ देणार नाही. जर ते इंदापूर मध्ये आले तर त्यांची सभा आम्ही उधळून लावू असा इशारा नितेश राणे यांना सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेला आहे.
तसेच मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमणास आमचा विरोधच आहे, नितेश राणे यांच्या इंदापूरमध्ये येण्याला आमचा विरोध असल्याचे सकल मराठा समाजाकडून स्पष्टीकरण देखील यावेळी देण्यात आले आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांचा दौरा पूर्वनियोजित असून होणारा मोर्चा हा होणारच. या मोर्चाला नितेश राणे हे उपस्थित राहून लोकशाही मार्गाने हा मोर्चा होणार असल्याचे नितेश राणे समर्थकांनी सांगितले आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये वातावरण तापले जाणार आहे.