ghulam nabi azad
ghulam nabi azadteam lokshahi

स्वतःचा पक्ष काढणार; गुलाम नबी आझाद यांची मोठी घोषणा

जम्मू-काश्मीरमध्ये परतणार
Published by :
Shubham Tate
Published on

ghulam nabi azad : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Gulab nabi Aajhad) यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा (resignation) ठोकला आहे. तसेच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jmmu-Kashmir) परत येऊन स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपात (BJP) जाणार अशी चर्चा सुरु होती. (jammu and kashmir own party a big announcement by ghulam nabi azad)

ghulam nabi azad
गणेश उत्सवात शिंदे गट ठाकरेंना देणारा धक्का

याच चर्चेच खंडण करताना ते म्हणाले, मी भाजपमध्ये जात असल्याचे माझे विरोधक गेली १५ वर्षे सांगत आहेत. त्यांनी मला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बनवले. आझाद म्हणाले, मी नवा पक्ष काढणार आहे. मी जम्मूलाही जाणार, काश्मीरलाही जाणार. आम्ही आमचा पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन करू यानंतर राष्ट्रीय स्तरावरही बघू.

ghulam nabi azad
कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36 वे राज्य अधिवेशन

भाजपमध्ये प्रवेश करणार? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, माझे विरोधक तीन वर्षांपासून ही गोष्ट सांगत आहेत. त्यांनी मला अध्यक्ष आणि उपाध्यक्षही केले होते. त्यांना भाजपच्या कोणत्या नेत्याचा फोन आला का असे विचारले असता. त्यावर आझाद म्हणाले की, भाजप नेते मला कशाला बोलावतील, आम्ही भाजपमध्ये थोडे आहोत.भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर गुलाम नबी आझाद म्हणाले की, आमचे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत. आम्ही कधीही कोणाला शिवीगाळ केली नाही. आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो.त्यामुळे सर्व पक्षांना माझ्याबद्दल आदराची भावना आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com