जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट

जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट

Jayant Patil यांनी हजर राहून वारंट रद्द करत जामीन मंजूर
Published on

संजय देसाई | सांगली : माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षापुर्वी गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात वारंट काढले होते. जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे.

जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट
शिवसेनेचा फैसला करणार आता निवडणूक आयोग; ठाकरे-शिंदेंना नोटीस

मागील जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मुंबई पोलीस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, विलासराव शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने आ.जयंत पाटील यांच्चयाविरोधात वारंट काढले होते. शुक्रवार २२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जयंत पाटील इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले व वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com