विरोधकांची ईडी चौकशी करणाऱ्या मोदी सरकारने अदाणींची चौकशी करावी; काँग्रेसचे आंदोलन

विरोधकांची ईडी चौकशी करणाऱ्या मोदी सरकारने अदाणींची चौकशी करावी; काँग्रेसचे आंदोलन

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यानंतर उद्योगपती अदानी पुन्हा चर्चेत आले असून वादाच्या भोवऱ्यात सापडले
Published on

सुरेश काटे | कल्याण : हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यानंतर उद्योगपती अदानी पुन्हा चर्चेत आले असून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. संसदेनंतर आता हा मुद्दा घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. देशभरात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली असून या पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली एसबीआय बँकेसमोर आंदोलन करण्यात आले.

विरोधकांची ईडी चौकशी करणाऱ्या मोदी सरकारने अदाणींची चौकशी करावी; काँग्रेसचे आंदोलन
नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का; पन्नासहून अधिक पदाधिकारी शिंदे गटात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. जनतेचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित राहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. विरोधकांची ईडी चौकशी करणारी मोदी सरकार अदाणी समूहाची इडी चौकशी करणार का? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com