दुसऱ्या निर्णायक सामन्यात भारताची आक्रमक गोलंदाजी, 108 धावातच न्यूझीलंड संघ तंबूत
सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज या दोन्ही संघात निर्णायक सामना रायपूर येथे पार पडत आहे. पहिली सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत 1-0 ने पुढे आहे. त्यामुळे भारतीय आज भारतीय संघ पूर्ण ताकदीने मैदानावर आज उतरला. मात्र, याच सामन्यात भारताच्या आक्रमक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला न्यूझीलंड संघ माफक 108 धावातच तंबूत परतला. त्यामुळे भारतीय संघाचा विजय आता सोपा झाला आहे.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मागील काही एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अगदी विशाल धावसंख्या उभारली होती. आजही नाणेफेक जिंकून भारत फलंदाजी घेईल असं वाटत होतं. पण भारतानं असं न करत गोलंदाजी निवडली. पण गोलंदाजांनी हा निर्णय अगदी पहिल्या ओव्हरपासून योग्य असल्याचं दाखवलं. शमीने पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ 108 धावांत ढासळला. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे.