इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
Published on

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यासाठी आज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. परंतु, पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून ताब्यात घेतले आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
सरकारकडे फॉरेन ट्रिप्सवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर...; आदित्य ठाकरेंचं आव्हान

विद्वेषाच्या घटनाचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. 'मीपण गांधी' हा नारा देत ही यात्रा काढण्यात आली असून या यात्रेत इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्ष सहभागी झाले आहेत. परंतु, आंदोलनात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. अशातच, अबू आझमी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com