Union Budget 2024: पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादेत 'एवढ्या' रुपयांची वाढ
मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर केला असून सकाळी 11 वाजता बजेट करण्यात आलं. अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती त्यासोबतच उद्योग या क्षेत्रांसाठीही घोषणा जाहीर केल्या आहेत. मुद्रा योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहे.
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना मुद्रा योजनेबाबतही महत्त्वाची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात पंतप्रधान मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्यात आली. त्यांनी म्हटलं आहे की, ज्या लोकांनी याआधीच कर्ज घेतलं आहे आणि वेळेतच कर्जाची परतफेड केली आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा देखील 20 लाखापर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मुद्रा योजनेतर्गत आधी 10 लाखापर्यंतचे कर्ज दिले जात होते. मुद्रा कर्जासाठी बँक, MFI वा एनबीएफसी या संस्थांशी संपर्क साधता येतो.
मुद्रा योजनेपूर्वी बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी खूप कागदपत्रांची मागणी केली जात होती. त्यामुळे छोटे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना खूप अशा अडचणी येत होत्या. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी एक महत्वाची अर्थ सहाय्य योजना आहे. हीची कर्ज मर्यादा 20 लाख केल्याने तरुणांना फायदा होणार आहे.