राजकारण
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सुमारे 50 हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सुमारे 50 हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडण्यासाठी याची मदत होणार आहे.
सुमारे 50 हजार मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हीडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्रे स्थापन केले जाणार आहे.