आमदार शिरसाटांकडून जजचे घर बांधणाऱ्या बिल्डरला धमकी, सदावर्तेंचा आरोप
अॅड. गुणरत्न सदावर्ते आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. या अॅड. सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत घेत, यावेळी अनेक राजकीय विषयावर भाष्य केलं. तेव्हा त्यांच्या कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील आणि पश्चिम आमदार संजय संजय शिरसाट यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
काय म्हणाले सदावर्ते?
औरंगाबादच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या बांधकाम प्रकरणात एका आमदार संजय शिरसाठ यांनी बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिली होती. 47 कोटी रुपये खर्चून न्यायाधीशांची निवासस्थाने बांधली जाणार होती. आपको औरंगाबाद में काम करना हैं. आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली होती, असा आरोपीही त्यांनी लावला आहे. वंडर कन्स्ट्रक्शनला काम घ्यायचं होतं, म्हणून संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती, असा गंभीर आरोप यावेळी सदावर्ते यांनी शिरसाटांवर केला.
इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा निषेध
पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, इम्तियाज जलील यांचा मी निषेध करतो. इम्तियाज जलील हे पीएफआयचे सहानुभूतीदार आहेत का? असा सवाल त्यांनी जलील यांना केला आहे. इम्तियाज जलील यांची वक्तव्य संभ्रम निर्माण करणारी आहेत. भारतात विघटन निर्माण करणाऱ्या संघटनेला इम्तियाज जलील समर्थन देत आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे.असे विधान यावेळी सदावर्ते यांनी केलं आहे.