पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणी आज (दि. ५) तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे आता इम्रान खान हे पुढील पाच वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
इम्रान खान यांनी दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांना आणखी सहा महिने तुरुंगात राहावे लागेल, असेही निकालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कधीही अटक करु शकतात.
काय आहे तोशाखाना प्रकरण
इमरान खान यांना जगभरातून ज्या काही भेट वस्तू मिळाल्या. त्या सगळ्या भेटवस्तू इम्रान खान यांना पाकिस्तानच्या तोशाखानामध्ये त्यांना जमा करायच्या होत्या. परंतु इम्रान खान यांनी त्या वस्तू जमा केल्या नाहीत. त्याचबरोबर त्या वस्तूंची विक्री केली आणि त्याचे पैसे घेतले. तसेच ते पैसे स्वत:कडे ठेवले या कायद्याचं उल्लंघन झालं आहे.