ईडीला माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा -उदयनराजे
प्रशांत जगताप | सातारा | दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात पोलीस आणि सरकारी वकिलांनी एक गंभीर प्रकार केला. न्यायालयाची दिशाभूल करून गंभीर कलम असलेल्या आरोपीला जामीन मिळाला. पोलीस, सरकारी वकील,आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी संगणमंताने हे केलं. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितला आहे
उदयनराजे भोसले हा आता केस लॉ झाला आहे उद्या मोका मधले आरोपी याचा फायदा घेऊ शकतात. हे जिल्ह्यासाठीच नाही तर देशासाठी घातक आहेत. मी मुख्यमंत्री, आणि सर्व मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो, यावर पुनर्विचार करा अन्यथा अनर्थ होईल. सर्व पोलीस रोगट नाहीत, पण त्यात काही नासके पोलीस अधिकारी आहेत. ते जास्त होत आहेत हे सर्व घातक आहे. लोकप्रतिनिधींचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. हे लोकशाहीचे मारक आहेत. काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात त्यांना निवडून आणतात, त्यांच्यामार्फत दबाव कायम ठेवण्याचा प्रयंत्न होत आहे. आणि हे असचं चालू राहील तर जंगलराज येईल लोकप्रतिनिधी यांनी ओळखावं उद्या तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते. ईडी ला माझी चौकशी करायची असेल त्यांनी खुशाल करा पण कारवाई करायची असेल तरच चौकशीला या असे देखील उदयनराजे म्हणाले आहेत. आणि सगळीकडे माध्यमांना घेऊनच ईडीची चौकशी झाली पाहिजे असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितला आहे.