भाजपा व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला तर चांगलेच :  रामदास आठवले

भाजपा व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला तर चांगलेच : रामदास आठवले

रामदास आठवले आज धाराशिव दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Published on

धाराशिव : भारतीय जनता पार्टी व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला तर चांगलेच आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. दोघातील वाद मिटवावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे. रामदास आठवले आज धाराशिव दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपा व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला तर चांगलेच :  रामदास आठवले
किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार! अनिल परबांनी मांडला हक्कभंग प्रस्ताव

रामदास आठवले म्हणाले की, वाद कधीही चांगले नसतात ते मिटलेच पाहिजेत. भारतीय जनता पार्टी व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद ही मिटायलाच हवा. होळीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस जे बोलले आहेत तसं त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. पण, उद्धव ठाकरे वाद मिटवतील असं वाटत नाही. त्यांनी वाद मिटवला आणि परत आले तर ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणतील. त्यामुळे उद्धव ठाकरे वाद मिटवतील असं वाटत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे संभाजीनगर या शहराचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षाची होती. ती मागणी केंद्र सरकारने परिपूर्ण केली आहे. त्या मागणीला आरपीआय पक्षाचा पाठिंबा असून त्याला विरोध करून काय होणार, असेही रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता.

दरम्यान, शरद पवार यांनी नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्यासोबत असला असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावं, असं जाहीर आवाहन आठवले यांनी बीडमध्ये पवारांना केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com