...तर मी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार; नारायण राणेंचे विधान

...तर मी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार; नारायण राणेंचे विधान

नारायण राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उत
Published on

मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना व शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना कोणाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार, असा प्रश्न विचारले असता त्यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिल्यास दसरा मेळाव्याला जाईन, असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राणेंच्या मनात नक्की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नारायण राणे म्हणाले की, मला बोलावलं तर जाईन. उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिले तरी जाईल पण, मला ते देणार नाहीत. उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

ते पुढे म्हणाले, उध्दव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाही. अडीच वर्षे या राज्याला ज्यांनी मागे नेले त्यांचे नाव घ्यायचे नाही आणि जे पक्ष त्यांना पाठींबा देत आहेत त्यांची अवस्था सध्या काय आहे मग ते काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, अशी टोलाही त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

अंधेरी पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीत शिवसेना व शिंदे गट आमने-सामने येणार आहेत. यावर नारायण राणे म्हणाले, त्यांच्याकडे उमेदवार राहिलेले नाहीत. सर्व शिंदे गटात गेले आहेत. आता भावनेचा विचार करून निवडणूक लढत आहेत. नागरिक भावनेवर मतदान करणार नाही. विकासावर मतदान होईल. निवडणुकी आधी चिन्हाचा निर्णय होईल, असे वाटते, अशी शक्यताही नारायण राणे यांनी वर्तविला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com