शेतकऱ्याची भन्नाट कल्पना! एका शाम्पूच्या पुडीने वाचवले लाखो रूपये व वन्य जीवांचे प्राण

शेतकऱ्याची भन्नाट कल्पना! एका शाम्पूच्या पुडीने वाचवले लाखो रूपये व वन्य जीवांचे प्राण

एका शेतकऱ्याने यावर भन्नाट कल्पना वापरली आहे. यामुळे त्यांच्या आयडीयाच्या कल्पनाची सर्वत्रच चर्चा होत असून त्याचे कौतुक होत आहे.
Published on

सूरज दहाट | अमरावती : रान डुकर अनेकदा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. परंतु, एका शेतकऱ्याने यावर भन्नाट कल्पना वापरली आहे. शेतकऱ्याने चक्क शॅम्पूचा उपयोग करत पिकांना वाचविले आहे. यामुळे त्यांच्या आयडीयाच्या कल्पनाची सर्वत्रच चर्चा होत असून त्याचे कौतुक होत आहे.

शेतकऱ्याची भन्नाट कल्पना! एका शाम्पूच्या पुडीने वाचवले लाखो रूपये व वन्य जीवांचे प्राण
नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव बंड येथील शेतकरी मनोज निंभोरकर यांनी ही अनोखी कल्पना वापरली यावर मनोज निरंभकर यांनी आपल्या शेतात दोन वर्षांपासून रानडुकरापासून हरभरा बियाण्याचा बचाव करण्याची नवीन शक्कल लढवली. या शेतकऱ्याने पेरणीपूर्वीच आपल्या हरभरा बियाण्यावर अंघोळीला वापरण्यात येणारा शाम्पू लावून ते उन्हात वाळविले. त्यानंतर त्या बियाण्यावर कीड प्रतिबंधक औषधी व रसायने लावून शेतात पेरणी केली.

रानडुकरांनी शेतात शिरून बियाणे खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, शाम्पूमुळे त्यांच्या तोंडात फेस होत होता. यामुळे कन्फ्युज झालेले रानडुकरे शेत सोडून पळू लागले. हा यशस्वी प्रयोग त्यांनी गतवर्षी सर्वप्रथम केल्याने त्यांचे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य नुकसान झाले. या शेतकऱ्याने एक देशी जुगाड करून आपल्या पिकाचे संरक्षण केले असून त्यामुळे एका अर्थाने उत्पन्नातही भरघोस भर पाडून घेतली आहे.

शेतकऱ्याची भन्नाट कल्पना! एका शाम्पूच्या पुडीने वाचवले लाखो रूपये व वन्य जीवांचे प्राण
आप आमदाराला कार्यकर्त्यांकडून मारहाण; सभेतून काढावा लागला पळ
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com