dilip walse patil
dilip walse patilTeam Lokshahi

राऊतांवरील कारवाईवर गृहमंत्री म्हणतात...

Published by :
Vikrant Shinde
Published on

राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवस केंद्र सरकार (Central Goverment) विरूद्ध राज्य सरकार (State Goverment) असा संघर्ष पाहायला मिळतोय. एकमेकांवर टीकांचं हे सत्र मागील अनेक दिवस पाहायला मिळतंय. भाजपकडून टीका करण्यात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आघाडीवर असतात तर महाविकासआघडीकडून (MVA Goverment) प्रामुख्याने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पाहायला मिळतात.

दरम्यान संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने (ED) कारवाई केल्याने राजकीय वर्तूळातून संमिश्र प्रतिक्रीया समोर येत आहेत. ह्याच प्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रीया समोर आली आहे.

दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रीया:

"संजय राऊत यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा समन्स न देता मालमत्ता जप्त केली जाते यावरून दिसत येते केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने कारवाई करत आहे." असं ते म्हणाले. तसेच, "सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार" असंही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com