भारतात हिंदू सुरक्षित नाही माझे स्पष्ट मत- प्रवीण तोगडिया
सूरज दाहाट|अमरावती: भारतात हिंदू सुरक्षित नाही असं खळबळजनक विधान आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख माननीय प्रवीण तोगडिया यांनी केलं, मी एका पक्षाला दोष देत नाही आज जे सत्तेत आहे त्यांना मी विनंती करतो,इस्लामिक जेहादी आतंकवादी विरोधात युद्ध घोषित करावं, व तब्लिकी जमातीवर बंदी घातली जावी,लोकसंख्या नियंत्रणाचा कायादा तयार व्हावा अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी केली
जातीचे नाव घेऊन हिंदूचे विभाजन करण्याचे पाप करु नका
संत रोहिदास जयंतीला संबोधित करतांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती या देवाने नाही तर पंडीतांनी निर्माण केल्याचे विधान केले होते. या विधानामुळे सध्या देशभरातील पंडितांकडून भागवत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संदर्भात अमरावतीमध्ये हिंदू सभेला संबोधीत करण्यासाठी आलेल्या डॉ. प्रविण तोगडिया यांना विचारणा केली असता ते म्हणाले, देशात सध्या हिंदू एक झाले आहेत. त्यांच्यामुळेच केंद्रात भाजपची सत्ता बनली तसेच अयोध्येमध्ये राम मंदीर सुध्दा बनत आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींचा आधार घेऊन तसेच जातीचे नाव काढून पुन्हा हिंदूचे विभाजन करण्याचे पाप करु नका, असे विधान डॉ. प्रविण तोगडिया यांनी केले आहे. हे विधान करतांना त्यांनी मोहन भागतव हे सरसंघचालक असून त्यांच्याविषयी मी कोणतीही टिप्पणी करणे योग्य नसल्याचेही स्पष्टीकरण यावेळी दिले.
आता राजकारणामध्ये हिंदूत्वाचा फायदा कोणत्या एका गटाला होणार नाही,राहुल गांधी,अखिलेश यादव,ममता बॅनर्जी केजरीवाल म्हणतात आम्हीच कट्टर हिंदू :- प्रवीण तोगडिया
ज्यावेळी एका गटासोबत हिंदू सोबत तर एक गट विरोधात होता तेव्हा हिंदूंत्वाचा राजकारणामध्ये एका गटाला फायदा होत होता, मात्र आता राजकारणाचे हिंदूकरण झाले आहे. राहुल गांधी, अखिलेश यादव,ममता बॅनर्जी,अरविंद केजरीवाल म्हणतात आम्हीच खरे हिंदू आहे. त्यामुळे आता हिंदूंचा कोण्याही एका गटाला किंवा पक्षाला फायदा होणार नाही, झाला तर तो थोडा थोडा सर्वांना होईल. आता एका गटाला किंवा पक्षाला फायदा पोहोचवण्यापासून आता हिंदुत्व पुढे गेल आहे.असे वक्तव्य आंतराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलं