मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ हेमंत पाटलांचा खासदारकीचा राजीनामा

मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ हेमंत पाटलांचा खासदारकीचा राजीनामा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाले आहेत.
Published on

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच, खासदार हेमंत पाटील यांना पोफळी दौऱ्यावर असताना गावकऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारत राजीनामा देण्याची मागणी केली. यानंतर हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ हेमंत पाटलांचा खासदारकीचा राजीनामा
सरकार आंदोलकांच्या जीवाशी खेळतंय; जरांगेंची प्रकृती खालवल्यावरून उद्धव ठाकरेंची टीका

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी पाठिंबा असून, त्यासाठी पदाचा राजीनामा देत आहे, असे खासदार पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. हेमंत पाटील यांच्या भूमिकेचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा देण्यापेक्षा एकत्रित यायला पाहिजे, सर्व नेत्यांनी तातडीने मुंबई गाठली पाहिजे. सगळ्या आमदार खासदारांनी मुंबईत येऊन, बसून आरक्षण द्यायला लावा. मराठा बांधव उग्र आंदोलन करत असतील तर ते करू नये. शांततेत ऐकून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com