Shivsena Dasara Melava 2022: उच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी केली मान्य
महाराष्ट्रात शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सत्तापालट झाला. तेव्हापासूनच राज्यातील राजकीय क्षेत्र अतिशय अस्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडेलेले आमदार, खासदार यांचा गट शिवसेना आपली असल्याचा दावा करत आहे तर, उद्धव ठाकरे हे शिवसेना आपली असल्याचं वारंवार सांगत आहेत. सध्या खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे. अद्याप शिवसेना कुणाची यावर न्यायालयाकडून निर्णय आलेला नाही. सध्या राज्यात शिवसेनेची परंपरा असलेला व शिवसैनिक वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावर वाद सुरू आहे. शिंदेगट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी केलेले अर्ज पालिकेने फेटाळले आहेत.
शिवसेनेची हायकोर्टात धाव:
शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेकडे शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी मागितलेल्या परवानगीवर उत्तर न आल्याने काल शिवसेनेनं काल मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
पालिकेनं अर्ज फेटाळले:
दादरमधील शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ येथे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. त्याच पार्श्वभुमीवर आधी उद्धव ठाकरे गट व नंतर शिंदेगटाने पालिकेकडे अर्ज केले होते. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका गटाला परवानगी दिल्यास राज्यात विशेषत: मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हणत महानगर पालिकेने दोन्ही गटांचे अर्ज फेटळण्यात आले आहेत.
शिवसेनेची मागणी न्यायालयाकडून मान्य:
मुंबई महानगर पालिकेने दोन्ही गटांचे अर्ज फेटाळल्यानंतर शिवसेनेने सुनावणीपुर्वीच सुधारित याचिका दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून दुपारी 2:30 वाजेपर्यंतचा वेळ मागून घेतला होता. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आता, पुढील सुनावणी उद्या दुपारी 12च्या सुमारास होणार आहे.