हसन मुश्रीफांना होणार अटक? कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

हसन मुश्रीफांना होणार अटक? कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

हसन मुश्रीफांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर ईडीच्या अटकेची टांगती तलवार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
Published on

मुंबई : मनी लाँड्रींगप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरु आहे. याविरोधात मुश्रीफांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळाला आहे. यामुळे हसन मुश्रीफांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर ईडीच्या अटकेची टांगती तलवार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

हसन मुश्रीफांना होणार अटक? कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरेंचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; शिंदेंची टीका

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरण ईडीकडून हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी ईडीने मुश्रीफांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. यानंतर त्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. याआधी सुनावणीचा निकाल येईपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. परंतु, आज त्यांचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला आहे. यामुळे मुश्रीफांना अटक होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com