...त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी, महाविकास आघाडीची फडणवीसांनी केली पोलखोल
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान, यावेळी भाजप नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.ये तो एक झाकी है २० तारीख बाकी है, आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय. जो हमसे टकरायेगा मिट्टीमे मिल जायेगा, विधानभवनाबाहेर भाजपा नेत्यांनी अशा घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्ते देखील विधानभवनाच्या बाहेर जमले होते. (happy moment for us as all three BJP candidates have won: BJP leader Devendra Fadnavis)
यावेळी बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीवघेण्या आजाराशी झुंज देणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी दोघेही रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल झाले. त्यांच्यामुळे विजय मिळाला. तसेच महाविकास आघाडी आमदारांना घोडे समजून घोडे बोलत होते, ते आमदारांना आवडलं नाही. आमदार काही घोडे नाहीत, त्यामुळे ते आमदारांना बोलणं लागलं, त्यांची बुद्धी जागी झाली आणि त्यांनी आम्हाला मतं दिली. आगे आगे देखिए होता है क्या, अस म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. अजूनही विजयाची पार्टी होऊ शकते, मुख्यमंत्री आमच्या पार्टीत येऊ शकतात असा सल्ला यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे. मंत्री टक्केवारी घेतात अशी तक्रार आमदार करतात. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे वेळ येऊद्या. अशी बोचरी टीका देखील फडणवीस यांनी केली.