'नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर'; पाटलांचे वक्तव्य चर्चेत

'नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर'; पाटलांचे वक्तव्य चर्चेत

भाजप पदाधिकाऱ्यांना गुलाबराव पाटलांनी चांगलेच फैलावर घेतले.
Published on

जळगाव : नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. गुलाबराव पाटलांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी युतीला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

'नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर'; पाटलांचे वक्तव्य चर्चेत
सभा होऊ द्यायची नाही म्हणून गालबोट लावण्याचा प्रयत्न करताहेत; राऊतांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपबरोबर आलेलो असून ज्यांना मोदींचे नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील. छोट्या-मोठ्या निवडणुकीसाठी काही जण राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसत असतील तर ते मोदींना धोका असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युतीला विरोध करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना खडसावले आहे.

तर, भाजपच्या गटातून युतीला काहींनी विरोध केला होता. या विरोध करणाऱ्यांचा गुलाबराव पाटलांनी चांगला समाचार घेतला आहे. या भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असे म्हणत विकासासाठी आम्ही उठाव केल्याचा पुनरुच्चार मंत्री त्यांनी केला आहे.

दरम्यान, जळगावमधील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असून पक्षनेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. अशात, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आजी-माजी पालकमंत्री समोरासमोर असल्यामुळे याकडे लक्ष लागून आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com