दादांना कोणी गद्दार बोलत नाही किती दहशत; गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी
मुंबई : इंडिया आघाडीची बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे महायुतीची देखील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यामुळे सबागृहात एकच हशा पिकला होता.
गुलाबराव पाटील म्हणाले की, पहिलं आमचं तिघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. पण, वेगळे झालो. देवेंद्र भाऊंनी गाडीत घेतलं मग दादा जोडले गेले. दादा आल्याने गद्दार बोलण्याचं बंद झालं. दादांना कोणी गद्दार बोलत नाही किती दहशत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
लोकसभेला 2024 ला आम्ही ताकद लावू. पण, आमच्या वेळी थोडी गडबड होते आमदारकीच्या वेळी गडबड नको. भाजप सोबत नेहमी होतो, राष्ट्रवादीच्या विरोधात नेहमी लढलो. आता घड्याळ्याने सांभाळून घ्यावं, अशी विनंती त्यांनी केली.
ममता ताई उठून गेल्या म्हणे. पवार साहेब थांब म्हणत होते. भाऊबीजचा दिवस आहे. इंडियाचं पुढे काय होणार यातून कळतं, असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.