विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठं गिफ्ट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठं गिफ्ट

विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
Published on

विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 19 हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ग्रीन एनर्जी, ग्रीन मोबिलिटी आणि सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात गुंतवणूक करणार. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक, ज्यामुळे 19 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्रात जवळपास 81 हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्याला यश आले आहे. अवाडा इलेक्ट्रो लिमिटेड 13 हजार कोटींची गुंतवणूक नागपुरात, तर पनवेलमध्ये 650 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ज्यामुळे 8 हजार जणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. अवाडा इलेक्ट्रो कंपनी ही सोलर पीव्ही मोड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर निर्मितीचे काम करते.

जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीकडून 25 हजार कोटींची नागपुरात गुंतवणूक, 5 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. लिथियम बॅटरी निर्मितीत जेएसडब्ल्यूकडून गुंतवणूक करण्यात येणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीकडून 27 हजार कोटींची गुंतवणूक, संभाजीनगरमध्ये 5 हजार 200 जणांना रोजगार मिळणार आहे. पर्नोड रिकार्ड कंपनीकडून देखील जवळपास 1785 कोटी रुपयांची गुंतवणूक, 800 जणांना रोजगार मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com