Girish Mahajan On Uddhav Thackeray : ठाकरेंची सभा; महाजनांची टीका
राज्यात सत्ताधारी पक्षाला आगामी निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याचे एका सर्व्हेत समोर आले आहे. यावर मंत्री गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सर्व्हेला किती महत्त्व द्यावं हा ज्याचा त्याचा विषय असतो. आता कुठे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत, असे अनेक सर्व्हे होतील. मी पण महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री म्हणून सर्व्हे करून दाखवू शकतो. देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्ष घराच्या बाहेरच पडले नाहीत. घरात बसूनच यांची कर्तबदारी मुलाखत तुम्हीच घेणार. मास्तरही तुमचा प्रश्नपत्रिकाही तुमची उत्तर काय द्यायचे हे तुमच्या हातात आहे. दोन वर्षात उद्धव ठाकरे काय करतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं, त्यामुळे सर्व्हेवर फार विश्वास ठेवू नका असे वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं आहे.
यांसह महाजनांनी उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र डागलंय. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची ठाण्यातील सभा हा केविलवाणा प्रयोग होता. ठाण्यात मराठी माणसांना सोडून ठाकरे उत्तर भारतीयांना जमा करत आहेत. आधी त्यांना शिव्या घालायच्या, त्यांना बाहेर काढायचं आता त्यांच्याविषयी प्रेम दाखवायचं. उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या काळामध्ये कधी घराच्या बाहेर पडले नाही आणि आता सांगत आहेत की, मी कशी सेवा केली? कशी मदत केली? कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी कसा घोटाळा केला, हे त्यांच्या अहवालात समोर आले आहे. कोरोना काळात तुम्ही मदत केली की मेलेल्या लोकांवर त्या टाळूचं लोणी खाल्लं हे आता स्पष्ट होईलचं. असे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.