पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील; गिरीश महाजनांचा दावा
जळगाव : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणात, राजस्थानमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. यादरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
राजस्थान अथवा मध्यप्रदेश सर्व राज्यांमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 325 जागांवर भाजपचाच विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्ष या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकूल आहे, असे पटोलेंनी म्हंटले आहे.