राज ठाकरे असो किंवा शर्मिला वहिनी, ठाकरेंचा मनाचा मोठेपणा...;  मनसे नेत्याची ती पोस्ट चर्चेत

राज ठाकरे असो किंवा शर्मिला वहिनी, ठाकरेंचा मनाचा मोठेपणा...; मनसे नेत्याची ती पोस्ट चर्चेत

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात लावलेल्या एसआयटीवरुन राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्य ठाकरेंची बाजू घेतली. या पार्श्वभूमीवर आता मनसे नेत्याने उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात लावलेल्या एसआयटीवरुन राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्य ठाकरेंची बाजू घेतली. आदित्य ठाकरे असं काही करतील असं मला वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. यामुळे शर्मिलाकाकू पुतणे आदित्य यांच्या मागं ठामपणं उभ्या राहिल्याचं दिसतं आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे असो किंवा शर्मिला वहिनी, ठाकरेंचा मनाचा मोठेपणा...;  मनसे नेत्याची ती पोस्ट चर्चेत
‘माझं घर जळत होते, पोलिसांना मी सतत फोन केले, पण…; क्षीरसागरांनी मांडली व्यथा

गजानन काळे म्हणाले की, अस्सल ठाकरे, आदरणीय राजसाहेब ठाकरे असो किंवा शर्मिला वहिनी. ठाकरेंचा मनाचा मोठेपणा काय असतो हे नेहमी दोघांनी आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून कायमच दाखवले आहे. ठाण्याला सेनेचा महापौर बसावा म्हणून मनसेच्या ९ नगरसेवकांचा पाठिंबा देणे असो नाहीतर वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार न देणे असो आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी कायम राजकारणापलीकडे नातं जपलं.

याउलट मुंबईतील मनसेचे ६ नगरसेवक खोके देवून फोडणे असो नाहीतर राजसाहेबांवर भाषण केले म्हणून केसेस टाकणं असो. मनसे हा संपलेला पक्ष म्हणून आदित्य यांनी केलेली विधाने असो अशी अनेक उदाहरणं देता येतील की यांच्याकडून मात्र कायमच राजकारणच करायचा प्रयत्न केला गेला. फरक स्पष्ट आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com