घासलेट चोर, मटणकरी, माकड! अमोल मिटकरींच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच गुढी पाडवा मेळाव्यातून हिंदू बांधवांना रामनवमी जोरात साजरी करण्याचं आव्हान केलं होतं. आज देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे. पण राज ठाकरे स्वत: विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली होती. याला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित "हिंदु जननायक" परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात , हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा, असा निशाणा मिटकरींनी राज ठाकरेंवर साधला होता.
गजानन काळे यांचे प्रत्युत्तर
गूगल वर "घासलेट चोर" टाकले की या मटणकरी माकडाची कुंडली दिसते. स्वतःच्या पक्षाच्या अधिवेशनात 'जाणते राजे' हजर होणार त्या दिवशीच याचे सो कॉल्ड 'दादा' परदेशीवारीला गेले होते विसरला वाटतंय. पण, याला काळजी माझ्या नेत्याची. ते म्हणतात ना स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून. असो या औरंगजेबाच्या औलादीच्या तोंडून प्रभू श्रीरामाचे नाव निघाले हेच माझ्या नेत्याचे यश, अशी जोरदार टीका काळेंनी अमोल मिटकरींवर केली आहे.